LIC IPO: जर स्वस्तात शेअर्स हवे असतील तर पॉलिसीधारकांनी ‘हे’ काम करावे

LIC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LIC च्या IPO ची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. विशेषत: पॉलिसीधारकांची नजर या IPO कडे आहे, कारण त्यांना स्वस्त दरात शेअर्स मिळणार आहेत.

तुम्ही देखील LIC चे पॉलिसीधारक असाल आणि IPO मध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी रांगेत असाल तर तुमचे पॅन कार्ड तुमच्या पॉलिसीशी लिंक करायला विसरू नका. कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी काही भाग राखून ठेवला आहे आणि सवलतही जाहीर केली आहे. मात्र, हे शेअर्स मिळवण्यासाठी तुम्हाला काही पूर्वतयारी करावी लागेल.

डीमॅट खाते उघडा आणि पॅन लिंक करा
पॉलिसीधारकांना पहिले डिमॅट अकाउंट उघडणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही IPO द्वारे शेअर्स खरेदी करू शकत नाही. हे काम ऑनलाइन सहजपणे करता येते. दुसरे, तुमची इन्शुरन्स पॉलिसी पॅन (कायम खाते क्रमांक) शी लिंक आहे का ते तपासा. कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांना तसे करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय IPO मध्ये अर्ज करणे अशक्य आहे.

कंपनीने दिले ‘हे’ निर्देश
LIC ने म्हटले आहे की, IPO मध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन डिटेल्स कंपनीच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले आहेत की नाही हे तपासावे लागेल. वास्तविक, सध्या LIC च्या बहुतेक पॉलिसीधारकांकडे डीमॅट खाते नाही. LIC च्या एकूण पॉलिसीधारकांची संख्या सुमारे 29 कोटी आहे, तर देशात आतापर्यंत फक्त 8 कोटी डिमॅट खाती उघडली गेली आहेत.

पॅन पॉलिसीशी कसे लिंक करावे ?

सर्व प्रथम LIC ची ही थेट लिंक

http://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर क्लिक करा.

येथे तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख dd/mm/yyyy फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.

दिलेल्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा पॅन टाकावा लागेल.

तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, जो एंटर करणे आवश्यक आहे.

त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट पर्यायावर क्लिक केल्यावर पॅन आणि पॉलिसी लिंक होतील.