LIC चा IPO मोडणार अनेक रेकॉर्ड, 1 कोटी रिटेल गुंतवणूकदार होऊ शकतात सहभागी

LIC IPO Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । LIC IPO जसजसा जवळ येत आहे तसतशी त्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. एकीकडे गुंतवणूकदार यासाठी सज्ज होत आहेत तर दुसरीकडे सरकारही या IPO साठी जोरदार तयारी करत आहे. आयुर्विमा महामंडळाचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असेल. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.

LIC चा अंदाज आहे की, या मेगा IPO मध्ये 75 लाख ते 1 कोटी रिटेल गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतात. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील कोणत्याही IPO साठी गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक हिस्सा असेल. वित्तीय बाजारपेठेत गुंतवणूक करणाऱ्या एकूण भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे 14 टक्के लोकं या IPO मध्ये पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसह गुंतवणूक करू शकतात.

व्यक्तीची सरासरी गुंतवणूक 30 ते 40 हजार असेल
मार्केट एक्सपर्ट्स च्या मते, या IPO बद्दल जितका प्रचार झाला आहे, त्या अर्थाने तो सबस्क्रिप्शन होण्याचा विक्रमही मोडू शकतो. यावेळी ओव्हरसबस्क्रिप्शन मिळणे अपेक्षित आहे. या गुंतवणूकदारांकडून LIC सुमारे 25 हजार कोटी गोळा करेल असा अंदाज आहे. कंपनीचा अंदाज आहे की, त्याच्या IPO मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सरासरी गुंतवणूक 30 ते 40 हजार असेल. इकॉनॉमिक टाइम्सने LIC च्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात ही माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, LIC ने हा अंदाज बुक रनर्स आणि स्टॉक मार्केटमधील इतर सहभागींकडून मिळालेल्या प्रारंभिक प्रतिक्रियांच्या आधारे काढला आहे.

उघडली जात आहे डीमॅट खाती
मार्केट एक्सपर्ट्स च्या मते, भारतात आतापर्यंत 7 कोटींहून जास्त डिमॅट खाती आहेत. LIC गेल्या काही काळापासून जाहिराती आणि मेसेजेस द्वारे आपल्या पॉलिसीधारकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना डिमॅट खाती उघडण्याचे आवाहन करत आहे. जेणेकरून त्याचे पॉलिसीधारक LIC च्या IPO मध्ये सहभागी होऊ शकतील.

LIC ला अपेक्षा आहे की, त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्चपर्यंत देशातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या 8 कोटींच्या पुढे जाईल. LIC चा IPO मार्चच्या शेवटच्या पंधरवड्यात येणे अपेक्षित आहे.

11 मार्च रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO लॉन्च होऊ शकतो
याआधी शुक्रवारी, न्यूज एजन्सी रॉयटर्सने काही विश्वसनीय सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की,” LIC च्या IPO चा आकार सुमारे $8 अब्ज (सुमारे 60,000 कोटी रुपये) असेल आणि तो 11 मार्च रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉन्च केला जाईल. त्याच वेळी, दोन दिवसांनंतर, 14 मार्च रोजी, ते उर्वरित गुंतवणूकदारांसाठी उघडले जाऊ शकते.”