LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लॅन, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  LIC कडून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना चालवल्या जातात. आताही LIC कडून एक नवीन पेन्शन प्लस योजना लाँच करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, LIC कडून आपल्या विमाकर्त्याला आयुष्यभर पेन्शनचा लाभ दिला जाईल. ही एक नॉन-पार्टिसिपेटेड, युनिट लिंक्ड पर्सनल पेन्शन योजना आहे, जी पद्धतशीर आणि शिस्तबद्ध बचतीद्वारे एक फंड तयार करण्यात मदत करते. या फंडाच्या मुदतीच्या शेवटी एन्युइटी प्लॅन खरेदी करून याला नियमित उत्पन्नात रूपांतरित केले जाऊ शकते. 5 सप्टेंबरपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे.

LIC launches New pension plus policy Know features and benefits | LIC Policy: ఎల్ఐసీ నుంచి కొత్త పెన్షన్ పాలసీ... రెగ్యులర్ ఇన్‌కమ్ అందించే ప్లాన్– News18 Telugu

हे लक्षात घ्या कि, युझर्सना ही योजनासिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी किंवा नियमित प्रीमियम पेमेंट प्लॅन अशा 2 मोडमध्ये खरेदी करता येईल. नियमित पेमेंट पर्यायामध्ये, पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीदरम्यान प्रीमियम भरावा लागतो.

LIC Introduces New Pension Plus Plan, Premium, Funds, Terms; Complete Details Here

प्रीमियमची रक्कम, पॉलिसी टर्म निवडण्याचा पर्याय

या योजनेमध्ये पॉलिसीधारकास प्रीमियमची रक्कम आणि पॉलिसीची मुदत, प्रीमियमची कमीत कमी आणि जास्तीत जास्त मर्यादा तसेच वय निवडण्याचा पर्यायही असेल. या योजेमध्ये काही अटींच्या अधीन राहून मूळ पॉलिसी सारख्याच अटी व शर्तींसह स्थगिती कालावधी वाढवण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. यामध्ये स्थगिती कालावधी म्हणजे असा अंदाजे कालावधी ज्यामध्ये पॉलिसीधारक काम करण्यास असमर्थ असण्याची अपेक्षा करतो.

LIC Saral Pension Plan Scheme Launched Know Who Can Buy How Much Regular Income Get LIC India Pension Annuity Plan Other Details | LIC Saral Pension Plan 2021: LIC's New 'Saral Pension

4 फंडांमध्ये गुंतवणूकीचा पर्याय

या योजनेमध्ये पॉलिसीधारकाला उपलब्ध 4 प्रकारच्या फंडांपैकी एकामध्ये प्रीमियम गुंतवण्याचा पर्याय देखील मिळतो. तसेच पॉलिसीधारकाने भरलेल्या प्रत्येक हप्त्यावर प्रीमियम अलोकेशन शुल्क आकारले जाईल. यातील उर्वरित रक्कम ही अलोकेशन रेट म्हणून ओळखली जाते, जी पॉलिसीधारकाने निवडलेल्या फंडाची युनिट्स खरेदी करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये पॉलिसी वर्षात फंड बदलण्यासाठी चार फ्री स्विचेस देखील उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans

हे पण वाचा :

Flight Booking : ‘या’ टिप्स वापरून स्वस्तात बुक करा फ्लाईट्सचे तिकीट !!!

Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

IRCTC : ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना जेवणासहित ‘या’ सुविधा मिळतात मोफत !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर तपासा

गेल्या 23 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!