हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC ची सरल पेन्शन योजना ही त्यापैकीच एक आहे. हे लक्षात घ्या कि, हा इमीडिएट एन्यूईटी प्लॅन आहे. याचा अर्थ असा कि, ही पॉलिसी घेताच आपल्याला पेन्शन मिळू लागेल. ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे. तसेच ही पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्यांदा जी पेन्शन मिळेल, तीच पेन्शन आयुष्यभर लागू असेल. या योजनेची खास गोष्ट अशी कि, यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर पेन्शन मिळवण्यासाठी वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याची गरज राहणार नाही.
या योजनेअंतर्गत वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन मिळू लागते. मात्र ही योजना घेण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील. यातील पहिला म्हणजे सिंगल लाइफ. ज्यामध्ये पॉलिसी एखाद्याच्या नावावर घेतली जाईल आणि त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मूळ प्रीमियमची रक्कम दिली जाईल. तर दुसरा पर्याय म्हणजे जॉइंट लाइफ. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही कव्हर केले जाते. तसेच यामध्ये आधी प्रायमरी पेन्शनधारकाला पेन्शन मिळेल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शन दिली जाईल. जर दोघांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला मूळ प्रीमियमची रक्कम दिली जाईल.
पात्रता काय आहे ???
इथे हे लक्षात घ्या कि, कमीत कमी 40 वर्षे आणि जास्तीत जास्त 80 वर्षे वय असलेल्या व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच यामध्ये पेन्शनधारक जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळत राहील. याचबरोबर ही पॉलिसी सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर कधीही बंद करता येऊ शकते. याची एक चांगली गोष्ट अशी कि, यामध्ये आपल्या पेन्शन कधी घ्यायची ते देखील ठरवता येते. म्हणजेच पेन्शनधारकाला दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांतून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
किती पेन्शन मिळेल ???
यामध्ये कमीत कमी 1,000 रुपये प्रति महिना किंवा 12,000 रुपये वार्षिकरित्या पेन्शन घ्यावी लागेल. मात्र यासाठी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच यामध्ये जास्तीत जास्त पेन्शन घेण्याची देखील कोणतीही मर्यादा नाही. या योजनेमध्ये 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम भरून दरवर्षी 50,250 रुपये पेन्शन मिळवता येते. मात्र यासाठी आपले 40 वर्ष असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, 1 लाख रुपयांच्या वार्षिक पेन्शन मिळवण्यासाठी 20 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
योजनेबाबत महत्वाची माहिती जाणून घ्या
या योजेनमध्ये गुंतवणूक करून केल्याच्या पहिल्या 6 महिन्यांनंतर कर्ज घेण्याची सुविधा मिळेल. तसेच यामध्ये 6 महिन्यांनंतर या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याचबरोबर यामध्ये दरवर्षी 5 टक्के निश्चित व्याज मिळते. याचबरोबर गुंतवणूकदार जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळेल. ही योजना खातेदार जिवंत असेपर्यंत सुरु राहत असल्यामुळे यामध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ मिळणार नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-Saral-Pension-PLan-No-862,-UIN-No-512N342V03
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा