हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर लाभ देण्याच्या उद्देशाने 2017 साली केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) सुरू करण्यात आली. LIC कडून चालविल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये 60 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिकरित्या पेन्शन मिळते.
पेन्शन योजना
एन्युइटी पर्यायांतर्गत ही पॉलिसी खरेदी करता येते. यामध्ये 12,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळवण्यासाठी 1,56,658 रुपये आणि 1,11,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळवण्यासाठी 14,49,086 रुपये गुंतवावे लागतील.
व्याजदर किती असेल ???
LIC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, या योजनेमध्ये वार्षिकरित्या 7.4 टक्के दराने व्याज दिले जाते. पेन्शनचा हा खात्रीशीर दर 31 मार्च 2023 पर्यंत खरेदी केलेल्या सर्व पॉलिसींच्या 10 वर्षांच्या पूर्ण पॉलिसी कालावधीसाठी लागू असेल.
कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध
या पॉलिसीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. यामध्ये खरेदी किंमतीच्या 75% इतकेच कर्ज मिळू शकेल. तसेच कर्जाच्या रकमेवर लागू होणारे व्याज दर हे नियमित कालावधीनुसारच निश्चित केले जातील.
असे असतील पेन्शनचे फायदे
हे जाणून घ्या कि, या योजनेअंतर्गत पेन्शनधारक दहा वर्षांच्या विमा कालावधीत जिवंत राहिल्यास त्याला पेन्शनची थकबाकी दिली जाईल (निवडलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक कालावधीच्या शेवटी). मात्र, या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याला खरेदीची रक्कम परत केली जाईल. जे त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना दिली जाते. LIC
अशा प्रकारे दिले जातील पैसे
या योजनेअंतर्गत पेन्शनचे पैसे देण्यासाठी NEFT किंवा आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम वापरली जाते. यामध्ये पेन्शनचा पहिला हप्ता प्लॅन खरेदी केल्याच्या तारखेपासून एक महिना, तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्षानंतर पेन्शनधारकाने निवडलेल्या पद्धतीनुसार दिला जाईल.
कर सवलत मिळेल का ???
हे लक्षात घ्या कि, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ही योजना पात्र नसल्यामुळे यामध्ये गुंतवणूकदाराला त्या तरतुदीनुसार 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी कपातीचा क्लेम करण्यापासून मर्यादा येईल. या योजनेतील रिटर्नवर सध्याच्या कर नियमांनुसार कर आकारला जाईल. तसेच या योजनेंतर्गत भरावे लागणारे लाभ निश्चित करताना भरलेल्या कराची (जीएसटी) रक्कम विचारात घेतली जाणार नाही. LIC
सरेंडर व्हॅल्यू किती असेल ???
जेव्हा पेन्शनधारकाला स्वतःच्या किंवा त्याच्या जोडीदाराच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असेल तेव्हा या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान त्वरित पैसे काढण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, थकबाकी सरेंडर व्हॅल्यू हे खरेदी किंमतींच्या 98% इतकी असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/Pradhan-Mantri-Vaya-Vandana-Yojana1
हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव