LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार नाही, त्यामागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या मूल्यांकनात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्यामुळे त्याची इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये येण्याची शक्यता नाही.

मूल्यांकनाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही
IPO च्या तयारीत गुंतलेल्या एका मर्चंट बँकरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की,”या मोठ्या कंपनीच्या मूल्यांकनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतरही या प्रकरणाशी संबंधित अनेक नियामक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल.”

अधिकाऱ्याने सांगितले की,”IPO आणण्यापूर्वी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. याशिवाय इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच IRDAI कडूनही परवानगी घ्यावी लागेल.” IRDAI प्रमुखाचे पद जवळपास 7 महिन्यांपासून रिक्त आहे. या अधिकाऱ्याच्या मते, अशा परिस्थितीत LIC चा IPO 2021-22 या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता फारच कमी आहे. आता या आर्थिक वर्षात केवळ 3 महिनेच उरले आहेत.

LIC चे मूल्यांकन खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे
LIC चे मूल्यांकन ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याचे कारण म्हणजे LIC चा आकार खूप मोठा आहे आणि त्याचे प्रोडक्ट मिक्स देखील मिश्रित आहे. त्यात रिअल इस्टेट मालमत्ता आणि अनेक उपकंपनी युनिट्स आहेत. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की,”मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत शेअर विक्रीचा आकारही ठरवता येणार नाही.”

सरकारने आर्थिक वर्ष 22 मध्ये निर्गुंतवणुकीचे 1.75 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले
चालू आर्थिक वर्षातच LIC चा IPO आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खरे तर, या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यात हा IPO अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याशिवाय BPCL च्या स्ट्रॅटेजिक सेलकडूनही सरकारला मोठ्या आशा आहेत. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की,”सरकार निर्गुंतवणुकीच्या दिशेने चांगली वाटचाल करत आहे.” त्या म्हणाल्या होत्या की,” नोकरशाही आणि विविध विभागांच्या त्रुटी दूर करण्यासाठी वेळ लागतो, मात्र सरकार गतीने प्रयत्न करत आहे.”

Leave a Comment