अनैतिक संबधातून लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या : अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची बिग्रेडियरची धमकी

Crime D
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवत, अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्रिगेडियरने या महिलेला ब्लॅकमेल केल्यानेच लेफ्टनंट कर्नल असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या महिलेचे पतीही जयपूर येथे लष्करी सेवेत असून या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी फिर्याद दाखल केली. त्यानंतर आत्महत्येप्रकरणी वानवडी पोलिसांनी बिग्रेडियर अजित मिलू (सध्या रा. बिग्रेडियर जनरल स्टाफ, हेड क्वार्टर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला, हिमाचल प्रदेश) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महिला अधिकारी सिमला येथे कार्यरत होती. या काळात 2019 पासून त्यांचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर अजित मिलू यांनी त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे वचन देऊन त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्यांचे अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून ते व्हायरल करून या महिलेला ते बदनाम करण्याची धमकी देत असत. ब्रिगेडियर अजित मिलू यांच्या धमक्यांना घावरून त्यांनी बुधवारी आत्महत्या केली,