Wednesday, March 29, 2023

ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच ….; भाजपचे प्रत्युत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजच्या सामना अग्रलेखातुन शिवसेनेचे भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. कमी प्रतिचा गांजा या मथळ्याखाली शिवसेनेने भाजपवर घणाघाती टीका केली आहे. यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेने वर पलटवार केला आहे. ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे. अस केशव उपाध्ये यांनी म्हंटल.

पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे. विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडते म्हणून मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची जुनी खोड आहे. ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे. अस केशव उपाध्ये यांनी म्हंटल.

- Advertisement -

अभिमान आहे मा. बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन सर्वसामन्य शिवसैनिकांना मोठं केलं. आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं सांगत त्याला पर्यावरण मंत्री बनवतात. बरं मुख्यमंत्रिपदाला घेण्याला भाजपाचा आक्षेप नाही. पण विश्वासघातकी मार्गानं ज्यांना लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांनाच सोबत घेऊन पदं मिळवणं याला मर्दानगी म्हणतात का? असा तिखट सवाल केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला केला.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात” असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे,एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले.

ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते अशी जळजळीत टीका शिवसेनेने केलीय.