सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब
तासगाव मधील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये पती सोबत झालेल्या वादाच्या रागातून पतीचा खून करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शांताबाई उर्फ शोभा कल्लाप्पा बागडी असे शिक्षा झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सदरचा गुन्हा हा 2019 साली घडला होता. आरोपी शांताबाई आणि तिचा मयत पाटील कल्लाप्पा बागडी हे दोघेजण तासगाव मधील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये राहत होते.
मयत कल्लाप्पा बागडी यांना टि. बी. चा त्रास असल्यामुळे ते कामधंदा करु शकत नव्हते. यावेळी आरोपी शांताबाई आणि कल्लाप्पा यांच्यात जेवण देण्याच्या कारणावरून वाद झाला. याच रागातून शांताबाईने रात्रीच्या वेळी धारदार वस्तारने कल्लाप्पा याचा गळा चिरुन खुन केला. सदर गुन्हयाच्या वेळी आसपासचे इतर कोणीसही गुन्हयाचा सुगावा लागणार नाही अशा परीस्थितीमध्ये शांताबाईने तिच्या पतीचा निर्घृण खुन केला.
शिक्षेपासून वाचता यावे म्हणून स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये जावून पतीने आत्महत्या केल्याची खोटी तकार नोंद केली. परंतु पोलिसांनी मयताच्या जखम बघून सदरचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आल्यामुळे सखोल तपास केला. सखोल तपासानंतर खुन तिच्या पत्नीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शांताबाईला शिक्षा सुनावली.