महाबळेश्वर प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी कांदाटी खोऱ्यात कोरोनाचा ससंर्ग वाढत असल्याचे कारण देत लाॅच बंद ठेवली असल्याची बतावनी केली आहे. गट विकास अधिकारी यांच्या डोक्यात काय कोरोनाचा ताप गेला की काय ? म्हणुन कांदाटी खोऱ्यातील शासकीय लाॅच सेवा देशात अनलाॅकडाऊन सुरु असताना बंद ठेवण्याचं पाप घोलप करत आहेत. कंदाटी खोऱ्यातील शासकीय लाॅच बंद केल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. आपत्ती व्यवस्थापनचे महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्ष तहसिलदार असताना गटविकास अधिकारी घोलप यांच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य कांदाटी खोऱ्यातील जनतेला बसत आहे.
बामणोली व तापोळा येथील शासकीय लाॅचची सेवा कांदाटी खोऱ्यातील जनतेची मुलभुत गरज आहे. गत सहा महिन्यापासुन लाॅकडाऊनमुळे शासकीय लाॅच सेवा बंद करण्यात आली होती. मात्र देशात अनलाॅकडाऊन सुरु झाले आहे. जिल्ह्यातील प्रवास बंदी उठवण्यात आली आहे. एसटी सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र शासनाच्या गाडीत फिरणाऱ्यांना सर्वसामान्य कांदाटी जनतेच्या पायाभूत सुविधांचा वाणवा अन् जनतेच्या दु:खाची सल काय कळणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे. गत सहा महिन्यापासून बंद शासकीय लाॅचमुळे खाजगी लाॅचधारक जादा पैसे कमवुन गब्बर झाले आहेत. मात्र गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी आपत्ती व्यववस्थापनात कोणताही अधिकार नसताना शासकीस लाॅच सेवा बंद का केली हा महाबळेश्वर तालुक्यांतील संशोधनाचा विषय झाला आहे.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती काळात कोणताही निर्णय परस्पर स्थानिक स्वराज्य संस्थेने घेवु नये असा स्पष्ट आदेश दिला असताना देखील गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी मनमानी कारभार केला आहे. शासकीय लाॅच बंद ठेवून जिल्हाधिकारी सातारा याच्या निर्णयाविरोधात कामकाज केले असल्याचे समोर आलं असून गटविकास अधिकारी नारायण घोलप याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तसेच कांदाटी खोऱ्यातील शासकीय लाॅच लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधुन होवु लागली आहे.