पुढील ४८ तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विदर्भातील बहुतांशी भाग सध्या उष्णतेची लाट सहन करीत असतानाच हवामान विभागाने येत्या ४८ तासात विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनसह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं काही मिनिटांपूर्वीच दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा हलक्या सरी बरसणार आहेत. झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात ढग साचण्याची शक्यता असून राज्यात अकोला इथं सर्वाधिक ४२.९ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ ते ११ एप्रिल दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १० व ११ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल तसेच हिंगोली, परभणी जिल्ह्यात १० व ११ एप्रिल आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment