हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय निवडणूक आयोग आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. यामुळे मतदार यादीतील डुप्लिकेट नावे आणि निवडणुकीतील हेराफेरी रोखण्यास मदत होईल असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. तसेच निवडणूक आणि मतदानात पारदर्शकता येईल व देशात खरे मतदार किती आहेत, हेही समजेल. ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे. मतदारांना लिंक करण्याची कोणतीही सक्ती केली जाणार नाही.
अशी करा नोंदणी
सर्वप्रथम, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी प्रथम NVSP (National Voter’s Service Portal)- www.nvsp.in वर नोंदणी करावी लागेल.
त्यानंतर पोर्टलच्या होम पेजवर मतदार यादीवर (Electoral Roll) क्लिक करा.
आता तुमचा मतदार ओळखपत्र बाबत माहिती टाका.
त्यानंतर उजव्या बाजूला Feed Aadhaar No वर क्लिक करा आणि आधार कार्ड आणि EPIC क्रमांकाचा तपशील टाका.
आता तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेलवर OTP येईल.
तुम्ही ते प्रविष्ट करताच, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक झाल्याचं नोटीफिकेशन तुम्हाला दिसेल.
दरम्यान, महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाची विशेष मोहीम सुरू झाली आहे. निवडणूक आयोग हे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ही जोडणी प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आणि विनामूल्य ठेवण्यात आली आहे. कोणत्याही मतदारांना हे करण्यास सक्तीने भाग पाडलं जाणार नाही.