अरे बापरे!! चक्क मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

0
79
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचा मंत्रालयातुन एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये चक्क बाटल्यांचा खच सापडलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेलं आहे. मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्याच कशा ? असा सवाल आता उपस्थित होतो.

या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या वारहंड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. दरम्यान, मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असताना या बाटल्या येतात कशा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपची टीका

दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार वर टीका केली आहे. मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात ? दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या ? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here