हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात गणेश उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो. यावर्षीचा गणेश उत्सव येत्या 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान आला आहे. यामुळे देशातील अनेक बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असतील. त्यामुळे बँकेमधील कामे खातेधारकांनी 19 सप्टेंबरच्या अगोदरच करून घ्यावीत, किंवा पुढील काळातील बँकांच्या सुट्ट्या तपासून बँकेत जावे.
गणेश चतुर्थीला बँकाना सुट्ट्या
हिंदू परंपरेत गणेश चतुर्थी हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. या दिवशी काही शहरांमधील बँकांना 18, 19 आणि 20 सप्टेंबरला सुट्ट्या लागून आल्या आहेत. 18 सप्टेंबर रोजी बेंगलुरु, चेन्नई, हैदराबाद, तेलंगणामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी राहील. 19 सप्टेंबर रोजी अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी या शहरातील बँका गणेश चतुर्थीमुळे बंद असतील. 20 सप्टेंबर रोजी, भुवनेश्वर आणि पणजीमधील बँका बंद असतील. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यात बँकांना 12 अधिकृत सुट्ट्या असतील. याशिवाय रविवार आणि पर्यायी शनिवारची सुट्टी जोडून तब्बल 16 दिवस बँका बंद असतील. चला तर मग जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात कोणत्या शहरातील बँका कोणत्या तारखेला बंद राहतील.
सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
22 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त पणजी कोची त्रिवेंद्रम येथील बँकांना सुट्टी राहील.
23 सप्टेंबर – देशभरात 14 शनिवार मुळे सर्व बँका बंद असतील.
24 सप्टेंबर – या दिवशी रविवार आल्यामुळे देखील बँका बंदच राहतील.
25 सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेव यांची जयंती असल्यामुळे गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल.
26 सप्टेंबर – मिलाद-ए-शरीफ मुळे जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद असतील.
28 सप्टेंबर – अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची अशा सर्व ठिकाणी ईद-ए-मिलाद मुळे बँकांना सुट्टी असेल.
29 सप्टेंबर – गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये ईद-ए-मिलाद-उल-नबीमुळे बँका बंद राहतील.