Monday, January 30, 2023

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन झाला वाद,लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीला जिवंत पेटवले

- Advertisement -

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – तिरुअनंतपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या एका युवकाने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळले आहे. यामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन वाद झाला होता. हा व्हिडिओ तरुणीने शूट केला होता. मंगळवारी या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि तरुणाने प्रेयसीला पेटवून दिले. या तरुणीचा गुरुवारी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही घटना केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील अंचलमध्ये घडली आहे. या प्रकरणातील मृत आथिरा अथिराला तिच्या लिव्ह इन पार्टनरने पेटवून दिले. हे दोघेजण बऱ्याच काळापासून एकत्र राहत आहेत. त्यांना तीन महिन्यांचे एक बाळही आहे. सगळं काही नीट चालू असताना दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यावरुन वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि आरोपी शानवासने आथिरावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.यानंतर स्थानिक लोक आथिराचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर आले तेव्हा आथिरा घरातून बाहेर पळत होती आणि तिला आग लागली होती. यानंतर सगळ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

यादरम्यान आरोपीदेखील जखमी झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. आथिराच्या आईच्या तक्रारीनंतर शानवासविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात शारिरीक आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तिने सांगितले कि तिला एक महिना फ्लॅटमध्ये बंधक बनवून ठेवले होते. या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ८ एप्रिलला आरोपी मार्टिन जोसेफ याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर यानंतर आरोपी मार्टिन जोसेफ फरार झाला. तसेच या आरोपीने मृत महिलेकडून पाच लाख रुपयेही बळकवले होते.