हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. ही एक सरकारी बचत योजना आहे. यामध्ये चांगला व्याज दर आणि कर सवलतीसारखे फायदे देखील मिळतात. याबरोबरच कर्जाच्या बाबतीतही हे खूप फायद्याचे आहे. कारण यामध्ये खूप कमी व्याजदराने अगदी सहजपणे कर्ज उपलब्ध होते.
हे लक्षात घ्या कि, गुंतवणूकीच्या प्रत्येक योजनेमध्ये कर्जाची सुविधा (Loan) उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे PPF खात्यामध्ये देखील कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पीपीएफ खात्याद्वारे किती कर्ज मिळेल आणि त्यावर किती व्याज आकारले जाते ते आज आपण जाणून घेउयात…
व्याज दर किती असेल ???
हे लक्षात घ्या कि, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा असलेल्या गुंतवणुकीच्या एकूण 25 टक्के रक्कम कर्ज म्हणून काढता येते. यासोबतच गेल्या आर्थिक वर्षातील 31 मार्च रोजी खात्यामध्ये असलेली शिल्लक रक्कमही तपासली जाईल. मात्र, याद्वारे कोणत्याही आर्थिक वर्षात फक्त एकदाच कर्ज मिळू शकेल. तसेच या कर्जाचा व्याजदर खात्यामध्ये उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा फक्त 1 टक्के जास्त असेल. म्हणजेच, जर PPF खात्यावर 7.1% व्याज मिळत असेल तर या कर्जावर 8.1% दराने व्याज भरावे लागेल. जे पर्सनल लोनपेक्षा खूपच स्वस्त आहे.Loan
साधारणपणे, कर्जे नेहमी आणीबाणीसाठी आणि इतर कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी घेतली जातात. अशा परिस्थितीत अनेक लोकं बँकांकडून पर्सनल लोन (Loan) घेतात. मात्र, बँकांकडून पर्सनल लोनवर 10-15% दराने व्याज आकारले जाते. अशा परिस्थितीत जर पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर ती आपत्कालीन परिस्थितीत आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
कर्जाचा कालावधी आणि इतर अटी
पीपीएफ खात्यावर घेतलेल्या कर्जाची परतफेड 36 महिन्यांमध्ये करता येते. यामध्ये जास्तीत जास्त 36 मासिक हप्ते करता येतील. ज्यामध्ये, पहिल्या कर्जाची परतफेड (Loan) केल्यानंतर पुढील कर्ज मिळते. तसेच जर कर्जाची मूळ रक्कम 36 महिन्यांच्या आत परत केली नाही तर 1% ऐवजी 6% व्याज दर द्यावा लागेल.
पीपीएफ खात्यातून कर्ज घेण्यासाठी फॉर्म डी वापरला जातो. यामध्ये कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी द्यावा लागेल. यासोबतच पीपीएफ पासबुकही द्यावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर एका आठवड्यामध्ये कर्ज मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
Bank Account शी मोबाईल नंबर लिंक करणे महत्त्वाचे का आहे??? जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा
Samsung Galaxy F04 : सॅमसंग भारतात लॉन्च करणार 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन