हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : गेल्या महिन्यात RBI कडून रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली. ज्या नंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. ICICI बँकेने विविध कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 20 बेस पॉइंट्स किंवा 0.20 टक्के वाढवून आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.याच्या परिणामी आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. 1 जुलै 2022 पासून बँकेचे हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
ICICI Bank च्या वेबसाइट वरील माहिती नुसार, आता एका ओव्हर नाईट कालावधीच्या MCLR चे व्याजदर 7.30% वरून 7.50% पर्यंत वाढले आहेत. तर एका महिन्याच्या कालावधीसाठीच्या MCLR चे व्याजदर देखील 7.30% वरून 7.50% वर आणले गेले आहेत. तसेच 3 महिने कालावधीच्या MCLR चे व्याजदर 7.35% वरून 7.55% वर आले आहेत. याशिवाय, 6 महिने कालावधीच्या MCLR चे व्याजदर 7.50% वरून 7.70% पर्यंत वाढवण्यात आले आहेत, तर एक वर्ष कालावधीच्या MCLR चे व्याजदर 7.55% वरून 7.75% करण्यात आले आहेत.
आता EMI देखील वाढेल
MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घ्या कि, बहुतेक ग्राहक कर्जे ही लोन मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन देखील महागतील. ICICI Bank
MCLR म्हणजे काय ???
हे लक्षात घ्या कि, MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँका कर्जासाठीचे व्याजदर ठरवतात. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशात MCLR लाँच केला. त्यापूर्वी सर्व बँकाकडून बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित केले जात असत. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता बँकांद्वारे MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर देखील परिणाम करते. ICICI Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates.page
हे पण वाचा :
Income Tax : आजपासून लागू झाले ‘हे’ मोठे आर्थिक बदल
Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत
Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन भाव तपासा
LPG Cylinder Price : दिलासादायक!! LPG गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर
UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे पाठवायचे ते पहा