गरजेच्या वेळी PPF वरूनही मिळू शकते कर्ज, मात्र ‘या’ आहेत अटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : PPF एक लॉंग टर्म सर्विस पर्याय आहे. अशातच मॅच्युरिटी पिरेड पूर्ण होण्यापूर्वी आर्थिक अडचणीच्या वेळी पीपीएफ तुम्हाला कामी येऊ शकतो. अचानक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर लोन हा पर्याय येतो. बँकेतून लोन घेण्यासाठी बेस किंवा गॅरंटीची गरज असते.कोणाकडेही कर्ज घेण्याचा कोणताही आधार किंवा हमी नसेल परंतु त्याने पीपीएफ (सार्वजनिक भविष्य निधि) खाते उघडले असेल तर पीपीएफवर कर्ज घेतले जाऊ शकते.

काय आहेत अटी

-पीपीएफ खाते उघडल्या गेल्या आर्थिक वर्षात, एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यावर कर्ज मिळू शकेल.

-PPF खात्यातील 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्ज काढता येऊ शकते. खात्यातून पैसे काढल्यानंतर पीपीएफच्या कर्जाचा लाभ घेता येणार नाही.

-आपण कर्जासाठी अर्ज करत असलेल्या वर्षाच्या पहिल्या दोन वर्षांच्या शेवटी, पीपीएफ खात्यात 25% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून घेतली जाऊ शकते.

-पीपीएफवर कर्ज घेतल्यावर पहिला कर्जाची मूळ रक्कम परत करावी लागेल. नंतर व्याजाची रक्कम चुकती करावी लागते.
दोन किंवा अधिक हप्त्यांमध्ये किंवा मासिक हप्त्यांमध्ये कर्जाची मूळ रक्कम चुकती केली जाऊ शकते.

-कर्जाची मूळ रक्कम खातेदाराने कर्ज घेतलेल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 36 महिन्यांत भरली पाहिजे.

-पीपीएफवरील व्याजापेक्षा कर्जावरील व्याजदर फक्त 1% जास्त आहे.पीपीएफला सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच जर तुम्ही कर्ज घेतले तर कर्जाचा व्याज दर 8.1 टक्के राहील.

-व्याजाची परतफेड दोन मासिक हप्त्यांद्वारे किंवा एकरकमी केली जाऊ शकते. जर तुम्ही कर्जाची मूलभूत रक्कम ठरलेल्या मुदतीत परत केली असेल, परंतु व्याजाचा काही भाग शिल्लक असेल तर तो तुमच्या पीपीएफ खात्यातून वजा केला जाईल.

-जर 36 36 महिन्यांच्या कालावधीत कर्जाची परतफेड केली गेली नाही किंवा फक्त अंशतः परतफेड झाली असेल तर उर्वरित कर्जाच्या रकमेसाठी पीपीएफवरील6%व्याज द्यावे लागेल.
-जर खातेदार मरण पावला तर त्याचा नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारस त्याच्या कर्जाचे व्याज दयावे लागेल.

-पीपीएफवरील व्याज दर तिमाही आधारे बदलू शकतात, परंतु कर्ज घेताना निर्णय घेतल्याप्रमाणे कर्जाची परतफेड होईपर्यंत कर्जाचा दर समान राहील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment