हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेकजण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रोज धडपड करत असतात. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा पैसा उभा होत नसल्यामुळे अनेकांचे हे स्वप्न अर्धेच राहते. बऱ्याच वेळा तर काहींना बँका कर्ज देखील देत नाहीत. अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना दहा लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. हे कर्ज कसे मिळते कोणाला मिळते याविषयी आपण जाणून घेऊया.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये एकूण तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे शिशु कर्ज, याअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना केंद्र सरकार पाच वर्षांसाठी कोणत्याही हमीशिवाय पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये आधीच व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना देखील कर्ज दिले जाते. तुम्ही जर पन्नास हजार ते पाच लाख पर्यंत कर्ज घेतले तर हे कर्ज किशोर कर्जाच्या श्रेणीत येते. या योजनेतील कर्जाचा तिसरा प्रकार म्हणजे तरुण कर्ज होय. यामध्ये तुम्हाला केंद्र सरकार व्यवसाय वाढवण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.
अर्ज करण्याची प्रकिर्या काय?
या योजनेसाठी ज्या व्यक्तींना अर्ज करायचा आहे त्यांनी mudra.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाऊनलोड करावा. यानंतर मिळालेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून तो फॉर्म जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँकेत जमा करावा. यानंतर सरकार सर्व माहितीची पडताळणी करून तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवते. सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला कर्ज देखील मिळवून जाते.
कागदपत्रे कोणती लागतात?
योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट, पत्ता अशी आवश्यक कागदपत्रे लागतील त्याचबरोबर व्यावसाय सुरू करण्यास संबंधित कागदपत्रे असतील तर ती देखील जोडावी लागतील. मात्र या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 24 ते 70 वर्षे असायला हवे.