Lockdown 5.0 | या ३ टप्प्यांत सुरु होणार व्यवहार; कोणती गोष्ट कधी सुरु होणार? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा थैमान जैसा थे आहे. ३१ मे रोजी देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील लॉकडाउन ३० जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. सरकारकडून आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. तसेच राज्यांना लॉकडाउन संदर्भातील नियम ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. तसेच कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागातील लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने या भागांतील गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. पाहुयात कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि कश्या टप्प्याने त्या सुरु होणार आहेत थोडक्यात

https://hellomaharashtra.in/financial-news/gold-prices-fell-as-locks-in-the-lockdown-came-find-out-todays-prices/

पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.

दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील. पालकांसह सर्व संबंधितांचे याबद्दल मत जाणून घेण्यात येईल. जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय होईल.

तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन, व्यवस्थित आढावा घेऊन रेल्वे, हवाई प्रवास कधी सुरु करायचा त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.