व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘दार उघडा उद्धवा !’ मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

नाशिक । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलन सुरू केलं आहे. पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा सर्वच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आज रस्त्यावर आले व त्यांनी सरकारचा निषेध करत घंटानाद केला. ‘दार उघडा उद्धवा’ अशा घोषणाही दिल्या.

कोरोनाच्या संकटात खबरदारी म्हणून मंदिरे, प्रार्थनास्थळं बंद ठेवण्याच्या निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. दरम्यान, राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं सर्व व्यवहार सुरळीत झाले. शक्य त्या गोष्टींवरील नियम व अटी घालत निर्बंध हटविले. मात्र, कोरोनाचा प्रकोप पाहता राज्यातील मंदिर अजूनही बंद आहेत.

दरम्यान, राज्यातील अनेक देवस्थानाचा अर्थकारणाशी मोठा संबंध आहे. देवस्थानच्या ठिकाणी चालणाऱ्या विविध व्यवसांयावर राज्यातील लाखो कुटुंबांची उपजीविका चालते. त्यामुळं मंदिरं उघडण्यास परवानगी दिली जावी, अशी भाजपची मागणी आहे. या मागणीला विश्व हिंदू परिषद, अध्यात्मिक समन्वय आघाडी, अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह अनेक धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.