हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अनलॉक ५ च्या गाईडलांईनची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. 30 सप्टेंबरला ही गाईडलाईन जारी करण्यात आली होती. यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहणार आहे. याचबरोबर आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी कोणताही बंधने टाकण्यात आलेली नाहीत. तसेच मालवाहतूक किंवा प्रवासासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
Lockdown shall continue to be implemented strictly in the Containment Zones till 30th November, 2020: Ministry of Home Affairs https://t.co/bfwwQDxm6R
— ANI (@ANI) October 27, 2020
गेल्या पाच आठवड्यांपासून कोरोनामुळे मृतांचा सरासरी आकडा कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 90.62% वर आला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. देशातील एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 78 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, प. बंगाल. दिल्ली, छत्तीरगढ आणि कर्नाटकमध्ये 58 टक्के मृत्यू होत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’