BREAKING : गोव्यातही कडक लॉकडाऊन जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत कॅसिनो, हॉटेल्स, पब राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशभरात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारनेही ३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

गोवा हे राज्य पर्यटनामुळे नेहमीच अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असते. विदेशी तसेच परराज्यातील पर्यटकांमुळे गोवा राज्याचा बाहेर राज्यातील अन परदेशातील नागरिकांशी सतत संपर्क असतो. कदाचित त्यामुळेच गोव्यातही मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परिणामी गोवा सरकारने आज पासून ३ मे पर्यंत राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू केली आहे.

दरम्यान, लॉकडाऊन कालावधीत गोव्यात अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक उपक्रमांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कॅसिनो, हॉटेल्स, पब बंद राहणारआहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वाहतुकीसाठी सीमा खुल्या राहतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

You might also like