औरंगाबाद दि.13 (सांजवार्ता ब्युरो) औरंगाबादेत वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे.शिवाय शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.आज आणि उद्या जिल्ह्यात कडक स्वरूपाचा लॉकडाऊन राहणार असून यामध्ये कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार आहे कोणकोणत्या सुविधा बंद राहणार आहे ते पहा.
—————————
चालू राहणाऱ्या सुविधा
वैधकीय सेवा,वृत्तपत्र मीडिया संदर्भातील सेवा, दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला व पुरवठा, जीवनावश्यक वस्तू दुकाने, पेट्रोल पंप,गॅस एजन्सी, सर्व वाहतूक सेवा (खाजगी व सरकारी) रिक्षा, बांधकामे,उधोग व कारखाने,किराणा (फक्त स्टॅण्ड अलोन) चिकन,मटण, मास,अंडी, मच्छी इत्यादी, वाहन दुरुस्ती दुकाने व वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा.
दोन दिवस हे राहणार बंद
दुकाने, बाजार पेठ,मॉल, चित्रपट गृहे,हॉटेल (प्रत्यक्ष डायनींग सुविधा बंद डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत),सर्व खाजगी कार्यालय/ आस्थापना.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा