Wednesday, February 1, 2023

सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद, मुख्यमंत्र्याचे आदेश

- Advertisement -

मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण ५२ रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खाजगी कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली केली आहे. तसेच कोरोनामुळे सुट्टीवर पाठवलेल्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज मध्यरात्रीपासून राज्यातील सर्व खाजगी कार्यालयांना हा आदेश लागू होणार आहे. सरकारी कार्यालयातही केवळ २५ टक्के कर्मचारी हजार राहतील असा निर्णयही शासनाकडून घेण्यात आला आहे.

करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..

कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे

जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा

लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा