औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने ११ मार्चपासून शहरात अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज या लॉकडाऊनच्या दुसऱ्या आठवडा असून शहरात सगळीकडे शांतता दिसली.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, पैठणगेट व औरंगपुरा भागातही शुकशुकाट दिसला. मुख्य ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी स्वतः शहरात सर्वत्र फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली होती. काही प्रमाणात वाहतूक मात्र सुरू असल्याचेही पाहयाला मिळाले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group