हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कोरोनाचा विळखा राज्याभोवती वाढत आहे. अशावेळी लॉकडाऊन होणारच असे संकेत सरकारमधील अनेक नेते देत आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच कडक लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. लॉकडाऊन लागणे हा अंतिम निर्णय असणार आहे, गेले काही दिवस मिटींग करतो चर्चा करतो आहे, अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्यात आणि मुंबईमध्ये सर्वाधिक केसेस आहेत पण मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या होत आहेत, असंही ते म्हणाले.
शिवाय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज प्रतिक्रिया दिल्याप्रमाणेच अस्लम शेख यांनी देखील असे सांगितले की लॉकडाऊन कसा असणार याबाबत अंतिम आणि चांगली एसओपी मुख्यमंत्र्यांकडून तयार केली जात आहे. त्यावर सीएम आज निर्णय घेतील. लोकांचे हाल व्हायला नको अशीच भूमिका असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय त्यांनी असे देखील म्हटले की अचानक लॉकडाऊन केला त्यावेळी अनेकांचे हाल झाले होते.
लॉकडाऊन या शब्दाला लोकं घाबरत आहेत. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन न करता काही निर्बंध लागू करता येतील का याबाबत विचार करून एसओपी जारी केली जाईल, असंही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.