नवी दिल्ली । देशभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आला आहे. यावेळी लॉकडाऊन करताना मात्र केंद्रानं काही सवलती दिल्या असून कंटेनमेंट झोनमध्ये मात्र ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रात्री फिरण्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. सोबतच योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टपासून अनलॉक ३ च्या टप्प्याला सुरुवात होत असून यावेळी कंटेनमेंट झोनबाहेर असणारे निर्बंध अजून शिथील करत अनके गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. केंद्रशासित प्रदेश, राज्यं सरकार तसंच इतर महत्त्वाच्या विभागांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे.
नवीन मार्गदर्शक नियमावलीनुसार, नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. यामुळं \रात्री फिरण्यावरील बंदी हटली आहे. याशिवाय योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा ५ ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”