राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारचं एकमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे समजत आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यावर ठाकरे सरकारचे एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यावर या बैठकीत सहमती झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला उपस्थित होते.

https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/fm-nirmala-sitharaman-press-conference-live-updates-on-economic-package/

केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं असून राज्यात १७ मे नंतर लॉकडाऊन वाढणार आहे. राज्यातील कोराना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन राज्य सरकार ३१ मे पर्यंत वाढवणार आहे अशी चर्चा आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासोबतच राज्यातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं कळत आहे. पण कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचंही समजत आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारडून घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १७ मे नंतरही लॉकडाउन कायम असेल अशी घोषणा केली होती. मात्र तो कधीपर्यंत कायम असेल तसंच कोणते निर्बंध शिथील असतील याची माहिती दिली नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

https://hellomaharashtra.in/bollywood-news/sunny-leon-unseen-photos/

https://hellomaharashtra.in/other/26-year-old-teacher-absconding-with-8th-standard-student-has-been-in-a-relationship-for-1-year/

https://hellomaharashtra.in/political-news/devendra-fadnavis-is-good-human-being-chandrakant-patil-on-eknath-khadse-criticise-him/