Wednesday, June 7, 2023

इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यासोबत २६ वर्षांची शिक्षिका फरार; १ वर्षापासून होते रिलेशनशिपमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल शहर पोलिस स्टेशन परिसरातील एका प्रेमप्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एक २६ वर्षीय शिक्षिका एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह बेपत्ता झाली. हा विद्यार्थी आठवीत शिकत आहे. या दोघांमध्ये गेल्या १ वर्षापासून जवळीक झाली होती. हा विद्यार्थी जेव्हा शाळेतून घरी परत आला नाही तेव्हा त्याचे कुटुंबीय काळजीत पडले. आपला मुलगा बेपत्ता झाल्याबद्दल वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनेकांशी विचारपूस केल्यानंतर ही गोष्ट समोर आली की त्या शिक्षिकेचे या विद्यार्थ्यांशी प्रेमसंबंध असून ते दोघेही कुठेतरी निघून गेले आहेत.

या विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, मी संध्याकाळी ७ वाजता घरी पोहोचलो तेव्हा मला आढळले की माझा मुलगा हरवलेला आहे. बायकोने सांगितले की मुलगा ४ वाजल्यापासूनच घरात नव्हता. मग त्यांनी शेजाऱ्यांना विचारले, त्याचा इकडेतिकडे बर्‍यापैकी शोध घेतला, मात्र तो कोठेही सापडला नाही. त्यानंतर आम्ही आमच्या मुलाला शिकवत असलेल्या त्याच्या एका वर्गशिक्षिकेच्या घरी गेलो तर त्याही त्यांच्या घरातून बेपत्ता असल्याचे आम्हांला समजले. बरेच प्रयत्न करूनही जेव्हा आमचा मुलगा सापडला नाही तेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क साधला.

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, ती शिक्षिका कलोल शहरातील दरबारी चौल भागातील आहे. गेल्या एक वर्षापासून तिचे या बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांशी बेकायदेशीर संबंध होते. शाळा प्रशासनानेही यासंदर्भात या दोघांनाही इशारा दिलेला होता. त्यामुळे अशी भीती व्यक्त केली जात आहे की, त्यांचे संबंध कोणाकडूनही न स्वीकारल्यामुळे त्यांनी घर सोडून इतरत्र जाण्याचा निर्णय घेतला असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.