Loco Pilot : लोको पायलटची भरती कशी होते? पगार किती मिळतो?

Loco Pilot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Loco Pilot । रेल्वेने प्रवास प्रत्येक जण करत असतात. त्याचबरोबर रेल्वेमध्ये बऱ्याच सरकारी नोकऱ्यांची भरती देखील केली जाते. रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी देशातील असंख्य युवक फॉर्म भरतात. रेल्वेमध्ये नोकरी लागणे हे बऱ्याच युवकांचे स्वप्न असते. पण रेल्वेमध्ये आणखीन एका पदासाठी भरती केली जाते. हे पद म्हणजे लोको ड्रायव्हर. लोको ड्रायव्हर म्हणजे ट्रेन ड्रायव्हर. परंतु ट्रेन ड्रायव्हर साठी कितीही शिक्षण झालेले असेल तरीही डायरेक्ट भरती केली जात नाही. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला असिस्टंट म्हणजे असिस्टंट लोको पायलट या पदावर भरती व्हावे लागेल. त्यानंतर उत्तम अनुभव आणि चाचणीनंतरच तुम्हाला लोको पायलट पदावर भरती केली जाते. परंतु बऱ्याच जणांना या पदाबाबत जास्त माहिती नसून आज आपण या पदासाठी लागणाऱ्या पदवी, परीक्षा आणि लोको पायलट ची सॅलरी याबाबत माहिती घेणार आहोत.

लोको पायलटसाठी शिक्षण- Loco Pilot

भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून किंवा रेल्वे ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळवण्यासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यासोबतच आयटीआय डिग्री देखील असणे गरजेचे आहे. ही डिग्री कोणत्या पण ग्रेड मेकॅनिकल, टेक्निशियन किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड यापैकी असावी लागेल. लोको पायलट भरतीसाठी सुरुवातीला असिस्टंट म्हणून भरती केली जाते. त्यानंतरच त्यांचे प्रमोशन लोको पायलट म्हणून केले जाते.

लोको पायलट वय मर्यादा

लोको पायलट (Loco Pilot) म्हणून अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. त्यासाठी किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 30 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

लोको पायलट निवड प्रक्रिया

लोको पायलट साठी दोन पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाते. लोको पायलट बनण्यासाठी सर्वात आधी लेखी परीक्षा द्यावी लागते. यामध्ये रिजनिंग, करंट अफेयर्स, सामान्य ज्ञान, सामान्य गणित,यासारखे विषय दिले जातात. तुम्ही एकदा लेखी परीक्षा पास केल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते. आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देखील डिले जाते. प्रशिक्षण झाल्यानंतर यशस्वी झालेल्या उमेदवारांना असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवड केली जाते.

लोको पायलट पगार –

लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट यांच्या पगारात जमीन आसमानाचा फरक आहे. असिस्टंट लोको पायलटची सॅलरी ही 30000 ते 35000 रुपयांपर्यंत असते. त्यानंतर अनुभव वाढल्यावर त्यांना प्रमोशन दिले जाते आणि त्यावेळी सॅलरी देखील वाढवली जाते