हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी सुरक्षा यंत्रणेच्या लापरवाहीमुळे लोकसभेच प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी येऊन खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. तसेच संपूर्ण सभागृहामध्ये गोंधळ माजवला. यानंतर सगळीकडे स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या सर्व घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. सध्या या सर्व घटनेची कसून चौकशी केली जात आहे. मुख्य म्हणजे, लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणामुळे आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षित या संदर्भात केलेल्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभेच्या कामकाजावेळी अचानक दोन तरुण आतमध्ये शिरल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचा गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी या दोन्ही तरुणांना आपल्या ताब्यात घेतले. सध्या या घटनेनंतर संसद परिसरात पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा दल तैनाब करण्यात आला आहे. याचबरोबर आत मध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गाडीची सुरक्षा दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच, बुधवारच्या घटनेनंतर सर्व खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची ‘स्मार्ट कार्ड’ तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभेमध्ये घडलेला हा सर्व प्रकार सुरक्षा रक्षकांनी केलेल्या लाहपरवाहीमुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे. योग्य सुरक्षा यंत्रणा राबवण्यात न आल्यामुळे हे तरुण आतमध्ये येऊन गोंधळ घालण्यास यशस्वी झाल्याचा आरोप देखील लावण्यात आला आहे. त्यामुळेच घडलेल्या घटनेवरील तैनाब असलेल्या आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, व्हिजिटर पास बनवण्यासाठी देखील बंदी घालण्यात आले आहे.