राष्ट्रीय सर्व्हे : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत तर कॉंग्रेस १०० जागांच्या आत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताच एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हे मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. तर कॉंग्रेस ९७ जागांवर गुंडाळला जाण्याची शक्यता या सर्व्हेतूनव्यक्त करण्यात आली आहे. तर प्रदेशिक पक्षांना कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे.

या सर्व्हेसाठी  देशातील  सर्वच म्हणजे ५४३ मतदारसंघातील मतदारांच्या मतांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या  सर्व्हे नुसार कॉंग्रेस आपल्या जागांचे शतक सुद्धा गाठू  शकणार नाही. तर भाजपला २३० जागा मिळणार असल्याचे या सर्व्हेत  सांगण्यात आले आहे. तर  भाजप प्रणित एनडीएला २७५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कॉंग्रेस प्रणित यूपीएला १४७ जागा जागा मिळतील तर अन्य पक्षांना १२१ जागा मिळण्याचा  अंदाज या  सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.  

तृणमूल काँग्रेसला २८, बीजू जनता दलाला १४, शिवेसनेला १३, समाजवादी पक्षाला १५, बसपाला १४, राजदला ८, जदयुला ९  असा जागांचा अंदाज  या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश मध्ये भाजपला मोठा फटका सहनकरावा लागेल असे या सर्व्हे वरून दिसून आले आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ४५ जागा मिळतील आणि महाराष्ट्रात सेना-भाजपला ३४ जागा मिळतील असे या  सर्व्हेत सांगण्यात आले आहे.   

 

 

Leave a Comment