उस्मानाबाद प्रतिनिधी | निखराची लढाई ठरलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. ओमराजेंच्या फेक व्हिडीओमुळे हि निवडणूक गाजली होती. तसेच शेतकरी आत्महत्येमुळे देखील या निवडणुकीला वेगळे वळण मिळाले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याने उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला आहे.
शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांना ५ लाख ८० हजार ५९३ मते मिळाली आहेत. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राणाजगजितसिंह पाटील यांना ४ लाख ५६ हजार ६५८ मते मिळाली आहेत. तर १ लाख २३ हजार ९३५ मतांच्या फरकाने ओमराजे निंबाळकर निवडून आले आहेत.
घात शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले आहेत. शिवसेनेला सोडून कॉंग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार सुभाष वानखेडे तेथे कॉग्रेस कडून पराभूत झाले आहेत. या मतदारसंघात गेल्यावेळी कॉंग्रेसचे राजीव सातव विजयी झाले होते. यावेळी मात्र हा मतदारसंघ कायम राखण्यास कॉंग्रेसला अपयश आले आहे.