पाच कोटीच्या खंडणी प्रकरणातील दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, लोणंद पोलिसांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | काही दिवसांपूर्वी लोणंद व बारामती पोलीस ठाण्यात अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा झाल्यापासून संशयित पसार होते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन संशयितांना तिरकवाडी, (ता. फलटण) येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव (रा. तिरकवाडी ता.फलटण) व विशाल दिनकर नरवडे (रा. नन्हे, जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत डोंबाळवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत सुळ वस्तीवरील कॅनॉलच्या पुलावरून अविनाश शामराव सोनवलकर (रा. डोंबाळवाडी) यांचे अपहरण करुन त्यांना पाच कोटींची खंडणी मागितली होती.

त्याचदिवशी लोणंद पोलिसांनी अविनाश सोनवलकर यांची सुनिल लक्ष्मण दडस (रा. दुधेबावी, ता. फलटण) येथून त्यांची सुटका केली होती. परंतु या प्रकरणातील संशयित पसार होते. पसार संशयितांनी बारामती येथेही एकाचे पाच कोटीसाठी अपहरण केले होते.लोणंद पोलिस स्टेशनची गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम मागावर होती.

Leave a Comment