कोरोना काळात IT कंपनीत नोकरी शोधताय? ‘या’ पाच कंपन्या 1 लाखाहून आधीक जणांची करणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. अशातच कोरोना काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. पण तुम्ही देखील आयटी क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. देशातल्या पाच दिग्गज आयटी कंपन्या एक लाखाहून अधिक जणांना रोजगार देणार आहेत. यात आयटी क्षेत्रातील हुशार तरुणांना संधी मिळू शकते.

यावर्षीच्या सर्वात मोठ्या भरती पैकी ही भरती असेल असा विश्वास बंपर हायरिंग द्वारे लाखो तरुणांना देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात चांगल्या टॅलेंटची मागणी वाढल्यामुळे आयटी कंपन्या या नोकर भरती करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यू मधून सुमारे 40 हजार नोकर भरती करेल. त्याचबरोबर इन्फोसिस कँपस इंटरव्यू मधून 25 हजार जणांची भरती करण्याची शक्यता आहे.

इकॉनोमिक टाइम्स च्या अहवालानुसार विप्रो कंपनी ही पूर्वीच्या तुलनेत जास्त नोकर भरती करेल. भरती ची संख्या कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यंदा 1,10,000 हून अधिक भरती करणार आहे. याच कंपन्यांनी गेल्या वर्षी 90 हजार पेक्षा जास्त भरती केली आहे.

कोरोना साथीच्या आजारांमुळे संपूर्ण देशात कामकाजाचा दिनक्रम बदलला. गेल्या वर्षीपासून बहुतांश कंपन्या लॉक डाऊन काळात वर्क फ्रॉम होम वर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. करोना काळानुसार वाढती मागणी पाहता बऱ्याच कंपन्या आणि ग्राहक आपला व्यवसाय ऑनलाइन केव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर लावण्याच्या तयारीत आहेत.

तज्ञांच्या मते या वर्षी वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन योजना तयार केली जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हायरिंग 20 टक्‍क्‍यांहून अधिक असेल. यासाठी भारताच्या पहिल्या पाच आउटसोर्स गेल्या वर्षी एकूण २. १० लाख नो करभरती केल्या. यावेळी हा आकडा अधिक असेल असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment