सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन ः जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन करण्यात येणार आहेत, त्यासंबधीचे आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काढलेले आहेत.

आज रात्रीपासून जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश लागू होणार आहेत. आदेशात साताऱ्यातील किराणामाल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने चिकन मटण आंडी दुकाने सकाळी 7 ते 11 या दरम्यान चालू राहतील. तसेच मेडीकल दुकाने सकाळी 7 ते 8 वेळेत चालु राहणार आहेत.

जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश आज रात्री पासून 1 मे पर्यंत लागु राहील. यामध्ये पावसाळा काही दिवसांवर आला असल्याने शेतसंबधी असणारी दुकानेही 7 ते 11 यावेळेत चालू राहणार आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like