प्रभू श्रीरामचंद्रांचे सुद्धा असे स्वागत झाले नसेल; पोहरादेवी प्रकरणावरून महेश टिळेकर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनाला वनमंत्री संजय राठोड काल पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी कोरोणा नियम पायदळी तुडवत एकच गर्दी केली होती. त्या प्रकाराची सगळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. समाज माध्यमात देखील त्याच्यावर टीका केली करत उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व समजले जाणारे निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी देखील या प्रकरणावर फेसबुक पोस्ट लिहून टीका केली आहे.

महेश टिळेकर म्हणतात…

कोरोना ची ऐशी की तैशी
नियमांचे उल्लंघन करून social distancing चा फज्जा उडवणारे समर्थक कोरोना कोळून पिल्यासारखे आपल्या नेत्याच्या नावाने बेंबीच्या देठा पासून घोषणा देताना पाहून नेत्यांची छाती अभिमानाने फुलत असेल. पण ह्या येड्यांच्या भरलेल्या बाजारामुळे कितीजणांच्या जीवाचा खेळ होतोय याची कल्पना संबंधित नेत्याला नसावी का?

युद्धात पराक्रम गाजवून आलेल्या एका वीर योद्ध्याचे होत नसेल असे असे स्वागत या नेत्यांचे भक्त चेले असणारे समर्थक करताना पाहून वाटतं की १४ वर्षांचा वनवास संपवून आलेल्या प्रभू रामचंद्रांचे पण असे स्वागत झाले नसेल. हा दिखावा कशासाठी तर आरोप झालेल्या एखाद्या प्रकरणातून सहिसलामत सुटण्यासाठी लोकांची सहानुभूती मिळाली तर निकाल आपल्या बाजूने लागेल म्हणूनच ना? पण मग यासाठी मंदिरातील देवाला वेठीस धरून स्वतः चा स्वार्थ साधून घेण्याचा हा डाव म्हणजेच राजकारण का?आपल्या नेत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले असताना प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेपर्यंत वाट न पाहणारे अतिउत्साही कार्यकर्ते कोरोना सारखी गंभीर परिस्थिती असताना आपला नेता कसा आदर्शवादी महात्मा आहे हे समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहून कोरोनाला ही फाट्यावर मारणारे हे समर्थक, कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आज आपण आहोत अशा महापुरुषांचा कुणी अपमान करतात तेंव्हा का नाही लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरत???

महेश टिळेकर

एकंदरीत या सगळयावरून प्रचंड राजकारण तपतांना आपण बघतोय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment