हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : प्रत्येकाला वाटत असते कि, आपले स्वतःचे घर असावे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या अभावामुळे घर खरेदी करणे खूप अवघड जाते. अशातच बँकांनी दिल्या होम लोनमुळे आता घर घेणे थोडे सोपे झाले आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँके कडून रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता लोन घेणे महागले आहे.
मात्र home loan घेताना बँकांकडून आकारले जाणारे व्याज आणि त्यावरील प्रक्रिया शुल्काची माहिती असणे महत्वाचे आहे. सर्वच बँका होम लोनवर एकसारखा व्याजदर देत नाही. प्रत्येक बँकेकडून त्यासाठी वेगवेगळे व्याजदर आकारले जाते. त्यामुळे होम लोन घेण्यापूर्वी व्याजाची माहिती घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बँका चला स्वस्त दरात होम लोन देत आहेत ते जाणून घेउयात …
बँक ऑफ महाराष्ट्र : या बँकेचा 20 वर्षांच्या कालावधीच्या 30 लाख रुपयांच्या होम लोनवर 7.30 -9.20 टक्के व्याज दर आहे.
इंडियन बँक : इंडियन बँक 30 लाख रुपयांच्या होम लोनवर 20 वर्षांच्या कालावधीसाठी 7.30-8.80 टक्के व्याज दर आकारत आहे. यासाठी एकूण रकमेच्या 0.40 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून आकारली जाईल. home loan
कॅनरा बँक : कॅनरा बँकेकडून 20 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाख रुपयांच्या होम लोनवर वार्षिक 7.05-9.30 व्याज दर आकारला जात आहे. बँक होम लोनच्या एकूण रकमेच्या (किमान 1,500 आणि कमाल 10,000) 0.50 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून आकारत आहे.
करूर वैश्य बँक : ही बँक 20 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाख रुपयांच्या होम लोनवर 7.5-9.35 दराने व्याज दर देत आहे. यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून 2500-7500 + GST आकारत आहे. Home Loan
बंधन बँक : ‘या’ बँकेकडून 20 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाख रुपयांच्या होम लोनवर वार्षिक 7.30-12.40 टक्के व्याजदर दिला जात आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया : 20 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाख रुपयांच्या होम लोनवर 7.40-9.10 टक्के दराने व्याज आकारत आहे. एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के (जास्तीत जास्त 15,000 रुपये + GST) प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागेल. Home Loan
पंजाब अँड सिंध बँक : ही बँक 20 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाखांपर्यंतच्या होम लोनवर 7.40.8.50 टक्के दराने व्याज देत आहे. यासाठी बँक कर्जाच्या रकमेच्या 0.15 ते 0.25 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून घेत आहे.
UCO बँक : या बँकेचा 30 लाख रुपयांच्या होम लोनवर 20 वर्षांच्या कालावधीसाठी 7.40-11.10 टक्के व्याजदर आहे. एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.5 टक्के (जास्तीत जास्त 15,000 रुपये + GST) प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागेल. Home Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/home-loan-interest-rate.html
हे पण वाचा :
ITC Share : बाजारातील चढ-उतारातही ITC चे शेअर्स गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर !!!
EPFO : नोकरी बदलल्यानंतर अशा प्रकारे नवीन खात्यात PF चे पैसे कसे ट्रान्सफर करा
Business Idea : अत्यंत कमी खर्चात ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा भरपूर पैसे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवीन दर पहा