हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Education Loan : उच्च शिक्षणाचे स्वप्न आपल्यातील अनेकजण पाहत असतात. मात्र बऱ्याचदा काही जणांना महागडी फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घेता येत नाही किंवा परदेशात जाता येत नाही. अशा परिस्थितीत, Education Loan उपयोगी ठरते. कारण याद्वारे आपल्या स्वप्नातील महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण घेता येऊ शकते. सध्या सरकारी तसेच खाजगी बँकांव्यतिरिक्त अनेक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय बँकांकडूनही कमी दराने Education Loan दिले जात आहेत.
जर आपण कर्ज घेऊन पुढील शिक्षण घ्यायचा विचार करत असाल तर ज्या बँकेकडून किंवा कंपनीकडून सर्वात स्वस्त दराने कर्ज मिळत आहे, त्या बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा. कारण कर्ज घेतल्यानंतर ते परत करावे लागेल आणि व्याजदर जास्त असेल तर त्याचा भार सहन करावा लागेल. तर आज आपण कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदा
सर्वात कमी व्याजाने Education Loan देणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये बँक ऑफ बडोदाचाही समावेश आहे. या बँकेचा एज्युकेशन लोनवरील व्याजदर 9.15 टक्क्यांपासून सुरू होतो. यामध्ये 1.25 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येऊ शकेल. यामध्ये 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी किंवा सिक्योरिटी भरावी लागणार नाही. मात्र जर कर्जाची रक्कम यापेक्षा जास्त असेल तर 1% रक्कम फी म्हणून भरावी लागेल. प्रोसेसिंग फीची जास्तीत जास्त रक्कम 10,000 रुपये आहे.
SBI
हे जाणून घ्या कि, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI कडून सर्वात कमी व्याजदराने Education Loan दिले जात आहे. या बँकेचा वार्षिक व्याजदर 8.55 टक्क्यांपासून सुरू होतो. तसेच SBI कडे 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क लागू होत नाही. मात्र 20 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या कर्जासाठी 10,000 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे SBI च्या 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या एज्युकेशन लोनवर कोणतीही सिक्योरिटी द्यावी लागत नाही, मात्र कर्जाची रक्कम त्यापेक्षा जास्त असेल तर सिक्योरिटी द्यावी लागेल.
PNB
पंजाब नॅशनल बँकेच्या Education Loan वरील व्याजदर 8.55 टक्क्यांपासून सुरू होतो. यामध्ये कर्जाच्या रकमेची मर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच या बँकेकडून आपल्याला हवे तितके पैसे कर्ज म्हणून घेऊ शकाल. मात्र PNB मध्ये प्रोसेसिंग फी म्हणून 250 रुपयांसहीत GST भरावा लागेल. यामध्ये 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या एज्युकेशन लोनवर कोणतीही सिक्योरिटी द्यावी लागत नाही, मात्र कर्जाची रक्कम त्यापेक्षा जास्त असेल तर सिक्योरिटी द्यावी लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/personal-banking/loans/education-loan
हे पण वाचा :
Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
Gold Loan : आपले दागिने दूर करतील पैशांची समस्या फक्त करावे लागेल ‘हे’ काम
Stock Market : आता भारतात बसून अशा प्रकारे अमेरिकन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तपासा
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया