LPG Price : एलपीजी सिलेंडर पुन्हा झाले महाग, आता तुम्हाला खर्च करावे लागतील इतके पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. 14.2 किलो सिलेंडर (LPG cylinder Price) च्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 किलो सिलेंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 36.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या आयओसी (IOC) नुसार दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलेंडर (LPG Price) ची किंमत आता 644 रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये ती वाढून 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये तर चेन्नईमध्ये 660 रुपये इतकी झाली आहे.

यापूर्वी 1 डिसेंबर 2020 रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) दरात वाढ करण्यात आली. 19 किलो कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत (Commercial Gas Cyliner Price) 55 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये HPCL, BPCL, IOC ने एलपीजी सिलेंडरची किंमत बदलली नाही.

सहसा तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमती सुधारित करतात, पण यावेळी काहीतरी वेगळंच घडलं. 1 डिसेंबर रोजी IOC ने सांगितले की 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत त्याची किंमत सलग सातव्या महिन्यात 594 रुपयांवर स्थिर ठेवली गेली आहे. परंतु 8 दिवसानंतर, इंडियन ऑयल वेबसाइटवर दिल्लीमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवून 644 रुपये झाली.

https://t.co/nXjOUXj41u?amp=1

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, 1 डिसेंबर रोजी देशातील चार महानगरांमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजीची किंमत दिल्लीत 594 रुपये, कोलकातामध्ये 620.50 रुपये, मुंबईत 594 रुपये आणि चेन्नईमध्ये 610 रुपये असे नमूद केले गेले. 9 डिसेंबर रोजी याच संकेतस्थळावर 14.2 किलो विना अनुदानित एलपीजीची किंमत दिल्लीत 644 रुपये, कोलकातामध्ये 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईमध्ये 660 रुपये करण्यात आली आहे.

https://t.co/OMFp9jY8uU?amp=1

एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंक वर आपण आपल्या शहर गॅस सिलेंडरची किंमत तपासू शकता.

https://t.co/zcpuHOTFdB?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment