नवी दिल्ली । देशात महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जारी केले आहेत. आता घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 719 रुपये झाली आहे. हे नवे दर 5 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 6 रुपयांने घसरले आहेत. यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (19 kg) च्या दरात 190 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आले होते. (LPG Gas Cylinder Price Hiked). देशातील ४ मुख्य शहरांतील गॅस सिलेंडरचे दर तपासले असता, दिल्लीत आणि मुंबईत घरगुती 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 719 रुपये आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे 745.50 रुपये आणि 735 रुपये इतका घरगुती गॅस सिलेंडरचा दर आहे.
महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारीला विना अनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नाही. मात्र, 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत 191 रुपयांची वाढ करण्यात आली. पण यानंतर 4 फेब्रुवारीला घरगुती एलपीजीच्या किंमती पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.