हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. याबरोबरच व्यावसायिक सिलेंडरमध्येही वाढ झाली आहे.
एलपीजीने नवीन दरवाढ केल्यानांतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांची वाढली आहे. ही वाढ आजपासून लागू झाली आहे.
अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. अशात एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असल्याने याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसणार आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1 हजार 103 रुपयांचा झाला आहे.
Domestic LPG Cylinder 14.2 kg prices increased by Rs 50/. Domestic LPG cylinder price increased to Rs 1103/ in Delhi: sources
— ANI (@ANI) March 1, 2023
दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2 हजार 119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1 हजार 103 रुपयांचा झाला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. वाढलेल्या दरामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.