LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट; पहा नवे दर

LPG Gas Cylinder Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील एकीकडे महागाईने (LPG Gas Cylinder Price) उच्चांक गाठला असतानाच सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली आहे. आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 

राजधानी दिल्लीत 19 किलोचा (LPG Gas Cylinder Price) व्यावसायिक सिलेंडर 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलेंडर 1976.50 रुपयांना होता. तसेच कोलकात्यात 2095.50 ऐवजी 1995.50 रुपये, मुंबईत 1936.50 ऐवजी 1844 रुपये आणि चेन्नईमध्ये 2141 ऐवजी 2045 रुपये किमतीत व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळेल. आत्तापर्यंत सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे.

हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार का ?  (LPG Gas Cylinder Price)

व्यवयसायिक सिलिंडरच्या दराच्या वाढीमुळे हॉटेल व्यवसायिकांनी अन्नपदार्थांचे दर देखील वाढवले होते. मात्र आता गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवणाचे दर कमी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळत आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1079 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1052.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.5 रुपये आहे.