हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वारंवार वाढत आहेत. गॅस सिलेंडर हा सर्व सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला एक भाग आहे. त्यामध्ये वाढ अथवा कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठी चिंता जाणवते. या नागरिकांसाठी एक समाधानाची बातमी म्हणजे, 1 एप्रिल पासून एलपीजी सिलेंडरची किंमत दहा रुपयांनी कमी होणार आहे. 819 रुपयांना मुंबईमध्ये मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर आता 800 रुपयांना मिळू शकणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोकांचे उत्पन्न घटले आणि आरोग्य सेवेवरचा खर्च पण वाढला. त्यात महागाईने तर लोकांच्या त्रासामध्ये अजून वाढ केली. सततच्या इंधन दरवाढीने लोक त्रासले असताना 10 रूपयांची दर कपात लोकांना काहीसा दिलासा देणारी आहे. असे जरी असले तरी ही दर कपात खूपच कमी आहे. याचे कारण की, मागील काही आठवढ्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. कपाती पुर्वीच्या गॅस सिलेंडरच्या किंमती ह्या मुंबईमध्ये 819 रुपये, दिल्लीमध्ये 819 रुपये, कोलकाता मध्ये 845.50 रुपये तर चेन्नईमध्ये 853 रुपये आश्या होत्या.
गॅस सिलेंडर दर वाढीसोबतच पेट्रोल-डिझेलच्या किंमती सुद्धा सारख्या वाढत आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये झालेली दर वाढ ही लक्षणीय आहे. देशात पहिल्यांदा पेट्रोलने काही भागात शंभरी पार केली आहे. सध्या देशाच्या राजधानी दिल्लीत पेट्रोल 90.56 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 80.87 रुपये प्रति लिटर आहे. पण मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरातही कपात झाली आहे. यामुळे आगामी काळामध्ये मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल असा कोणता निर्णय शासन घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group