सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

gas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया- युक्रेन युद्धांचा मोठा परिणाम इंधन दरवाढी वर झाला आहे.

इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडणार आहे

मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.