LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार; केंद्र सरकारचा जनतेला मोठा दिलासा

LPG Cylinder Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देशात महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर जनतेला आता स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. मात्र या सबसिडीचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाच मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9.60 कोटी लाभार्थ्यांसाठी मोदी सरकारने अनुदानाचा कालावधी एका वर्षासाठी वाढवला आहे. याअंतर्गत उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना पुढील एक वर्षासाठी प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान मिळत राहणार आहे. एका वर्षात एकूण 12 एलपीजी सिलिंडरवर ही सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली.

अनुराग ठाकूर म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मे 2022 मध्ये केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी अशीच पुढे सुरु राहील. सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 7,680 कोटी रुपये खर्चाचा बोजा सरकारवर पडणार आहे.