LPG Price Cut : LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त; जनतेला मोठा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमती कमी (LPG Price Cut) झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल ७२ रुपयांनी स्वस्त केला आहे. त्यामुळेच हॉटेलचे जेवण आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती कायम ठेवल्या आहेत.

कोणत्या शहरात किती रुपये दर? LPG Price Cut

नवीन दरानुसार, आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 69.50 रुपयांनी स्वस्त झाला (LPG Price Cut) असून तो आता 1676 रुपयांना मिळेल. मुंबईत सिलिंडर 69.50 रुपयांनी कमी होऊन 1629 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये सिलिंडरचे दर ७२ रुपयांनी कमी झाले असून त्याची किंमत आता 1840.50 रुपये झाली आहे. चंदीगडमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1697 रुपयांना, चेन्नईमध्ये 1840.50 रुपये, मध्य प्रदेशमध्ये 1704 रुपयांना आणि लखनऊमध्ये 2050 रुपयांना उपलब्ध होईल.

दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी करण्यात (LPG Price Cut) आले आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. 1 मे रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर आता जून महिन्यात सुद्धा जवळपास ७० रुपयांनी स्वस्त झाल्याने जनतेला सध्याच्या महागाईच्या काळात थोडाफार तरी दिलासा मिळाला असं म्हणता येईल.