महाबळेश्वरात बिबट्याचे दर्शन, लाॅकडाऊनमुळे प्राणी रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाबळेश्वर पाचगणी रस्ता हा सतत वाहतुकीचा रस्ता म्हणुन ओळखला जातो. पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या रस्त्यांवर वाहनांची कायम रेलचेल असते. मात्र सध्या लॉक डाऊन मुळे या रस्त्यावर तुरळक वाहतूक असल्याने जंगली प्राणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर मध्ये हिरडा नाक्यावर आज चक्क बिबट्याचे दर्शन झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सदैव गजबजलेल्या हिरडा नाक्यावर लाॅकडाऊनमुळे शांतता पहायला मिळत आहे. येथील एका हॉटेल मधील कर्मचार्याला आज बिबट्या रस्त्यावर दिसला असल्याचे बोलले जात आहे. सदर कर्मचार्‍याने याचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर शेयर केल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. या व्हिडिओ मध्ये बिबट्या जखमी अवस्थेत असल्याचे दिसत असल्यामुळे वन खात्याचे पथक बिबट्याच्या शोधावर असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे सर्व उद्योग धंदे बंद आहेत. पाचगनी, महाबळेश्वर येथील पर्यटकांवरही याचा मोठा परिणाम झाला असून येथील रस्ते प्रथमच सामसूम असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच वन्यप्राण्यांनी आता रस्त्यांचा ताबा घेतल्याची चर्चा आहे.

Leave a Comment