औरंगाबाद । आरटीई प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत पालकांच्या पाल्यांची नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून, जिल्हा स्तरावरील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करताना प्रवेशाचा ड्रॉ मंगळवारी ६ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. सीबीएसई शाळांच्या ११ जागांसाठी पालकानी दीड हजार अर्ज दाखल केले, असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ साली करण्यात आला. जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३६२५ जागा आहेत. त्यासाठी ११ हजार ९०५ पालकांनी अर्ज निश्चित केले आहेत. तर १ हजार ३४२ पालकांनी अर्ज भरले. परंतु त्यांची निश्चिती ऑनलाइन केलेली नाही, अशी माहिती आरटीई प्रवेश समन्वयक अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा देखील इंग्रजी माध्यमासह सीबीएसई पॅटर्नच्या शाळांनाच प्रवेशासाठी पालकांनी पसंती दर्शवली असून, नामांकित शाळांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले आहेत. दरम्यान ३० मार्चपर्यंत देण्यात आलेली अर्जाची मुदत आता संपली असून, प्रवेश निश्चितीसाठी पात्र ठरणाऱ्या पाल्यांची अंतिम यादीसाठीचा ड्रॉ मंगळवारी ६ एप्रिल रोजी काढण्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou